जगातील सर्वात मोठी सेल्फी काढल्याचा मायक्रोसॉफ्टचा दावा

selfi
मायक्रोसॉफटने त्यांच्या ल्युमिया ७३० या मिड रेंज स्मार्टफोनच्या सहाय्याने जगातील आजवरची सर्वात मोठी सेल्फी काढल्याचा दावा केला असून यात ११५१ लोकांचा एकत्र फोटो काढला गेला आहे. बांग्लादेशात ही सेल्फी काढली गेली असून यासाठी कोकाकोला बरोबर पार्टनरशीप केली गेली होती असेही समजते. मायक्रोसॉफटला गिनीज बुककडून या सेल्फींची नोंद केली गेल्याच्या बातमीची प्रतीक्षा आहे असेही सांगितले जात आहे. ज्यांचा चेहरा ओळखू येत आहे अशा सर्वात जास्त संख्येने माणसांचा फोटो या कॅटेगरीखाली गिनीज बुककडे हा फोटो पाठविला गेला आहे.

ल्युमिया ७३० हा खास सेल्फी फोन म्हणूनच लाँच करण्यात आला आहे. त्याला पाच मेगापिक्सलच्या कॅमेर्‍यासह वाईड अॅगल लेन्सची सुविधाही दिली गेली आहे. त्याच्या सहाय्यानेच ही सर्वात मोठी सल्फी काढली गेली आहे. ऑस्कर इव्हेंटच्या सेल्फीची सर्वाधिक रिट्वीटेड सेल्फी म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद केली गेली होती. त्यापूर्वी हे रेकॉर्ड अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नावावर होते. लावा आयरिस एक्स पाच ने १००० लोकांचा एकत्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न नुकताच केला आहे मात्र ल्युमियाने एकाचेवळी ११५१ जणांचा एकत्र फोटो काढला आहे. ल्यमियासाठी खास सेल्फी अॅपही दिले गेले आहे.

Leave a Comment