ओसामाच्या पुतळ्याला लिलावात ७ लाख रूपये किंमत

osama
जगभरात दहशतवादाचे प्रतीक ठरलेला आणि त्यामुळे जगातील कोट्यावधी नागरिकांच्या तिरस्काराचे केंद्र बनलेला अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा एक पुतळा लिलावात ७ लाख रूपयांना विकला गेल्याचे वृत्त आहे. हा पुतळा कुणी खरेदी केला त्याचे नांव जाहीर करण्यात आलेले नाही.

ओसामाचा हा पुतळा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयनेही तयार करवून घेतला होता.यात ओसामाला सैतानाच्या रूपात दाखविले गेले होते. २००५ मध्ये तयार केलेल्या या पुतळ्याच्या अनेक नकला करून अफगाणिस्तानात वाटले जाणार होते. या पुतळ्याच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील लहान मुले व त्यांच्या पालकांनी लादेन व अलकायदाला समर्थन देणे थांबवावे यासाठी प्रयत्न केले जात होते.

हा पुतळा १२ इंची असून त्याचे कोडनेम डेव्हील आय असे करण्यात आले होते. यात ओबामाचा चेहरा काळ्या व लाल रंगात रंगविला गेला होता तर डोळे हिरवे केले गेले होते. यामुळे तो भीतीदायक वाटत असे. या पुतळ्यासाठी खर्च आला होता २५०० डॉलर्स व त्याला सर्वाधिक बोली मिळाली ११७७९ डॉलर्सची. हेसब्रो कंपनीसाठी जीआजो खेळण्यांचे डिझाईन करणार्‍या डोनाल्ड लेवाईन याने हा पुतळा तयार केला होता. लेवाईन यांचा मे महिन्यात मृत्यू झाला असेही समजते.

Leave a Comment