अमेरिकेचे संरक्षणमंत्री हेगल यांचा राजीनामा

hegel
वॉशिग्टन – इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी ओबामा प्रशासनाला करावा लागलेला संघर्ष आणि सिनेट मध्ये डेमोक्रेटिक पार्टीने बहुमत गमावल्यामुळे अखेर व्हाईट हाऊसच्या दबावाखाली अमेरिकेचे संरक्षण मंत्री चक हेगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा सकाळी दिला असल्याचे समजते. हेगल यांनी स्वतःच आपल्या राजीनाम्याचे वृत्त दिले असून ओबामा प्रशासनातून राजीनामा देऊन बाहेर पडणारे ते तिसरे संरक्षणमंत्री आहेत. नवीन मंत्र्यांची नेमणूक होईपर्यंत हेगल काम पाहणार आहेत असेही समजते.

विशेष म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टीच्या सरकारात हेगल हे रिपब्लीकन पार्टीचे एकमेव सिनेटर आहेत. व्हिएतनाम युद्धात त्यांचा सहभाग होता तसेच इराक युद्धातही त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. ओबामा हेगल यांच्या निर्णयपद्धतीवर नाराज होते असेही समजते. नव्यानेच भारताच्या संरक्षणमंत्रीपदाची धुरा घेतलेल्या मनोहर पर्रिकर यांच्याबरोबर भेटीची योजना हेगल यांनी नुकतीच तयार केली होती तसेच मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कारभारात भारत दौर्‍यावर आलेल्या ओबामा प्रशासनाच्या तीन कॅबिनेट मंत्र्यात हेगेल यांचा समावेश होता. ओबामा यांनीच त्यांना संरक्षणमंत्री बनविले होते. त्यापूर्वीही ते दोन वेळा सिनेटर होते.

Leave a Comment