मुंबई – महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काल केलेल्या शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत मोबाईलचे बिल भरता मग वीजबिल का नाही भरत, या वक्तव्यावरुन चहूबाजूंनी जोरदार झाल्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केले गेल्याचे सांगून सारवासारव केली आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला – खडसे
शेतकऱ्यांनी मोबाईल बिलाचे पैसे वाचवून ते वीजेसाठी वापरावे, असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता, असेही खडसे यांनी नमूद केले. मात्र ज्यांना भूईमुग जमिनीखाली उगवतो की जमिनीवर हे माहित नाही, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सरकरातर्फे शेतकऱ्यांच्या वीजबिलात जवळपास ३३ टक्के सूट जाहीर करण्यात आली असून दहावी आणि अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्कही माफ करण्याची घोषणा खडसेंनी केली. मात्र टंचाईग्रस्त भागांसाठी लागू होणाऱ्या नियमांचाच पुनरुच्चार खडसेंनी केल्याने सरकारी घोषणा पोकळ असल्याचे समोर आले आहे.