माजी मुख्यमंत्री अत्यवस्थेत

antuly
मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले गेल्या महिन्याभरापासून रुग्णालयात असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या महिन्याभरापासून किडनी निकामी झाल्यामुळे अंतुले रुग्णालयात आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मोहन प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या अत्यंदर्शनासाठी मुंबईत आलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात येणार होत्या. मात्र कार्यक्रमात बदल झाल्यामुळे त्यांनी पटेल आणि मोहन प्रकाश यांना भेट घेण्यास सांगितल्याचे संजय दत्त यांनी सांगितले.

८५ वर्षीय अंतुले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिपद भुषवले होते.

Leave a Comment