दोन डिसेंबरपासून पुन्हा बँका बंद

bank
नवी दिल्ली – येत्या दोन ते पाच डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांतील सरकारी बँकांचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर जाणार आहेत. या संपाचे आवाहन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचार्यांच्या संघटनेने केले आहे.

आधीच्या एक दिवसीय लाक्षणिक संपातून सरकारला जाग येईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आता पाच दिवसांचा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे महासचिव सी.एच.व्यंकटचलम् यांनी दिली.

संघटनेने आखलेल्या कार्यक्रमानुसार, प्रत्येक क्षेत्रात संपाच्या आधी निदर्शनेही केली जाणार आहेत. दोन डिसेंबरला दक्षिण क्षेत्रात, ३ ला उत्तर आणि ४ व ५ डिसेंबरला अनुक्रमे पूर्व आणि पश्चिआम क्षेत्रात संप पुकारण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांयच्या वेतनवृद्धीचा प्रश्नत नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित आहे. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात सध्या २७ बँका कार्यरत असून, त्यात ८ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकांच्या देशभरात पन्नास हजारांवर शाखा आहेत.

Leave a Comment