इंटरनेट युजर संख्येत भारत घेणार अमेरिकेवर आघाडी

internet
नवी दिल्ली – स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध होत असलेले स्मार्टफोन आणि मोबाईल ब्रॉडबँडची वाढत चाललेली लोकप्रियता यामुळे २०१६ पर्यंत भारत अमेरिकेला इंटरनेट युजर संख्येत मागे टाकून जगात दोन नंबरवर येईल असा विश्वास ई मार्केटर या अमेरिकन फर्मने व्यक्त केला आहे. २०१६ मध्ये भारताची ऑनलाईन पॉप्युलेशन २८ कोटी ३८ लाखांवर जाईल तर अमेरिकेत हाच आकडा २६ कोटी ४९ लाखांवर जाईल असे या फर्मचे म्हणणे आहे. सध्या जगात ऑनलाईन पॉप्युलेशनमध्ये चीन आघाडीवर असून तेथे ७० कोटी इंटरनेट युजर आहेत.

विशेष म्हणजे इंटरनेट मोबाईल असो.ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनलने डिसेंबर २०१४ मध्येच भारत अमेरिकेला इंटरनेट युजर संख्येत मागे टाकेल असे जाहीर केले असून या काळात भारताची इंटरनेट युजर संख्या ३२ टक्कयांनी वाढून ३० कोटी २० लाखांवर जाणार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन फर्म ई मार्केटरच्या वरीष्ठ विश्लेषक मोनिका पर्ट या संदर्भात म्हणाल्या की अतिविकसित देशात इंटरनेट मार्केट मध्ये सॅच्युरेशन आले आहे त्या तुलनेत विकसनशील देशात इंटरनेट विकासाला खूपच मोठा वाव आहे. २०१४ ते १८ या सालात भारत व इंडोनेशियात ही वाढ प्रत्येक वर्षात दोन आकडी असेल. जगात इंटरनेट युजरची संख्या २०१५ पर्यंत ६.२ टक्यांनी वाढून ३ अब्जांवर जाईल असे दिसून येत आहे. यावर्षात जगात दर पाच माणसांमागे २ इंटरनेट युजर आहेत.

Leave a Comment