नवी दिल्ली – देशातील सेलकॉन हा मोबाईल कंपनीने देशातच हँडसेट कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आंध्र व तेलंगणा या राज्यांचा प्रामुख्याने विचार केला जात असल्याचे कंपनीचे कार्यकारी प्रमुख मुरली रेतनेनी यांनी सांगितले. ते म्हणाले की स्वतःच्या उत्पादनासाठी आम्ही या दोन्ही राज्यांच्या सरकारशी बोलणी केली आहेत.
सेलकॉन भारतात मोबाईल कारखाना काढणार
कंपनी सध्या त्यांचे हँडसेट चीनमधून आयात करते. त्याऐवजी आता भारतातच कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.कंपनीची २०१३-१४ सालातीत उलाढाल ८५० कोटी होती ती १४-१५ सालात १२०० कोटींवर नेण्याचे उदिष्ट ठेवले गेले आहे असे सांगून रेतनेनी म्हणाले, आम्ही उत्तर भारतात नेटवर्क विस्ताराची योजना आखली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही आम्ही पाऊल ठेवत आहोत. सध्या कंपनीच्या उलाढालीतील ५० टक्के वाटा दक्षिण भारताचा आहे. मात्र आता राजस्थान, गुजराथ, बिहार व उत्तरप्रदेशातही नेटवर्क मजबूत केले जात आहे.
कंपनीच्या उत्पादनांची सध्याची विक्री दरमहा ६ लाख इतकी आहे ती १० लाखावर नेण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी सतत नवीन मॉडेल्स बाजारात आणली जात आहेत. अँड्राईड फोन जानेवारी २०१५ मध्ये बाजारात आणला जात आहे तर कंपनीने नुकतीच तीन मॉडेल्स मिलेनियम वोग क्यू ४५५, अल्ट्रा क्यू ५००, मिलेनिया एपिक क्यू ५५० बाजारात आणली आहेत.