टोकियो – समुद्राच्या लाटांवर तरंगणारे शहर बनविण्याची योजना जपानच्या वैज्ञानिकांनी आखली असून हे काम ब्ल्यू स्काय कंपनीकडे सोपविले जाणार आहे. अटलांटिस नावाचे हे शहर २०३० सालापर्यंत उभारले जाणार असून शहराचा ग्लोब शिमिझू कंपनी बनविणार आहे.
समुद्री लाटांवर तरंगणारे शहर उभारणार जपान
या शहर उभारणीसाठी टोकियो विश्वविद्यालय, जपानची समुद्री पृथ्वी विज्ञान संस्था ब्ल्यू स्काय कंपनीला सहाय्य करणार आहे. या शहरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड वायूचे ऑक्सिजन मध्ये रूपांतर करण्याची यंत्रणा तयार केली जात असून समुद्रतळ आणि त्यावरचा स्तर यातील तापमानातील फरकाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जाणार आहे. अतिप्रचंड वादळे आली तरी हे शहर समुद्रात ४ हजार मीटर खोल डूबकी मारून सुरक्षित राहिल असे सांगितले जात आहे.
५०० मीटर परिघाच्या या शहरात ५ हजार नागरिक राहू शकणार आहेत. शहर उभारणीसाठी २५ अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे आणि या कामासाठी १५ वर्षे लागतील असेही सांगितले जात आहे.