काठमांडू – नेपाळमधील काठमांडू येथे २६ व २७ नोव्हेंबरला होत असलेल्या सार्क संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ एकाच खोलीत दोन दिवस एकत्र राहणार असल्याचे वृत्त आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद अकबरूद्दीन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी पाकिस्तानकडून भारताला चर्चेसंदर्भात कोणतीही विचारणा झाली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
मोदी शरीफ यांचा दोन दिवस एकत्र मुक्काम
यावर्षीच्या ऑगस्टमध्ये भारत पाक सचिव पातळीवरची चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वी पाक सरकारने तेथील फुटीरतावादी गटांशी चर्चा केल्याने ही बोलणी रद्द करण्यात आली होती. आजही पाक पंतप्रधान नवाझ शरीफ भारत पाक चर्चेअगोदर फुटिरतावादी नेत्यांशी चर्चा केली जाईल असेच सांगत आहेत. त्यामुळे मोदी शरीफ भेटले तरी त्यांच्याच औपचारीक चर्चा होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. अर्थात दोन दिवस हे नेते एकत्र असतील त्यामुळे त्यांच्यात कांहीतरी बोलणे होणारच असेही अकबरूद्दीन म्हणाले.