मुंबई : मागील १२ वर्षांपासून सुरू असलेला अभिनेता सलमान खानच्या ‘हिट ऍन्ड रन’ प्रकरणाला महिन्याभरात निकाली काढण्याच्या सूचना सरकारी वकीलांना सत्र न्यायालयाने दिल्या आहेत.
महिन्याभरात निकाली काढा सलमानचा खटला
न्यायालयाने ‘हिट ऍन्ड रन’ प्रकरणाच्या आज झालेल्या सुनावणीत या सूचना दिल्या असून येत्या ३ डिसेंबरला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. अमेरिकन लाँड्रीचा व्यवस्थापक मार्क डिसूजा आणि सलमानच्या मोटारीचा विमा काढणारा गुरूचरण मल्होत्रा या दोघांचे जबाब नोंदविण्यात आले. सरकारी वकिलांनी साक्षीदारांची यादी दिली नसल्याचा आरोप सलमानच्या वकिलांनी केला. या सुनावणीला सलमान न्यायालयात हजर नव्हता. मात्र, पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.