रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन द्या…

ambulance
मुंबई – रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून न देणार्या् वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम वाहतूक पोलिस मुंबईत राबवत आहेत. मुंबईत अनेक मोठी सरकारी आणि खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, विरार, पालघर या जिल्ह्यांतील गंभीर अवस्थेतील रुग्णांना मुंबईतील दवाखान्यांत उपचारांसाठी आणले जाते. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीच्या वेळी या रुग्णवाहिका अडकून पडतात. याबाबत काही दिवसांपूर्वी एका सामाजिक संस्थेने वाहतूक विभागाचे सहआयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली होती. रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली होती. यापुढे रुग्णवाहिकांच्या मार्गात अडथळा आणणार्याू वाहनचालकांवर कारवाई केली जाईल, असे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

Leave a Comment