यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला ओबामा प्रमुख पाहुणे

obam
यंदाच्या प्रजासत्ताकदिनासाठी म्हणजे २६ जानेवारी २०१५ च्या समारोहासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ओबामांना उपस्थित राहण्याचे दिलेले आमंत्रण ओबामांनी स्वीकारले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. यामुळे ओबामा या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे पहिले अमेरिकी अध्यक्ष असतील तसेच अध्यक्षपदाच्या कार्यकालात दोन वेळा भारत भेटीवर येणारेही ते पहिलेच अमेरिकन अध्यक्ष असतील.

भारताचे पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये वॉशिग्टन भेटीवर गेले असताना दोन दिवस त्यांची ओबामांबरोबर विविध विषयांवर चर्चा झाली होती. त्यानंतर या महिन्यात म्यानमार येथे झालेल्या इस्ट एशिया समिटमध्येही मोदी आणि ओबामा यांची भेट झाली तेव्हा ओबामांनी मोदींचा उल्लेख मॅन ऑफ अॅक्शन असा केला होता. ओबामांनी प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण स्वीकारून हा स्नेह अधिक दृढ करण्याचे संकेत दिले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Comment