निष्ठावंत शिवसैनिकाचा होणार सन्मान

arvind
मुंबई – शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले नारायण राणे यांचा जो पर्यंत पराभव होत नाही, तोपर्यंत अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा करणारे निष्ठावंत शिवसैनिक अरविंद भोसले यांचा ‘सुवर्ण पादुका’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना आज सोन्याच्या चपला देण्यात येतील. आरवली येथील वेतोबा मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडेल.

arvind1

शिवसेना आणि बाळासाहेबांशी नारायण राणे यांनी गद्दारी केल्याचा दावा अरविंद भोसले यांचा होता. राणेंनी कोकणी माणसांशी गद्दारी करत २००५मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे अरविंद भोसले यांचे म्हणणे असल्यामुळे कोकणात जोपर्यंत भगवा फडकत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ अरविंद भोसले यांनी घेतली होती.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक यांनी काँगेसचे प्रचार प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केल्यामुळे अरविंद भोसले यांची शपथ पूर्ण झाली. त्यानंतर भोसले यांनी पायात चपला घालायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसैनिकांनी तब्बल तेराशे चपलांचे जोड दिले होते. भोसले हे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख आणि वरळीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. आता त्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे.

Leave a Comment