नामदेव ढसाळ यांच्या पत्नीचा ‘पँथर’ला जय भीम

dhasal
मुंबई- नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ कवयित्री मल्लिका अमरशेख-ढसाळ यांनी संघटनेतील सर्व पदांचा त्याग करून सर्व सूत्रे नागपूरच्या प्रकाश रामटेके या जुन्या कार्यकर्त्याच्या हाती सुपूर्द केल्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

नामदेव ढसाळ स्थापनेपासून पँथरचे संस्थापक-अध्यक्ष होते. ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. त्यानंतर संघटनेची सूत्रे त्यांच्या पत्नी मल्लिका यांनी हाती घेतली; परंतु त्यांना बाजूला ठेवून इतरच निर्णय घेऊ लागल्यामुळे मल्लिका यांनी काम करण्याचे थांबवले होते.

माझा पिंड राजकीय कार्यकर्त्याचा नाही. त्यामुळे मी यापुढे संघटनेत कार्यरत न राहण्याचे ठरवले आहे. पँथरमध्ये यापुढे माझी काही एक भूमिका नसेल, असे मल्लिका ढसाळ यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment