डायलेसिस आता कमी खर्चात होणार

dylisis
नवी दिल्ली – किडनीच्या विकाराने त्रस्त रुग्णांसाठी एक विशेष पडदा मुंबईतील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केला असून त्यामुळे ५० टक्के कमी खर्चात व कमी वेळात डायलेसिस करणे शक्य होणार आहे. किडनी खराब झाल्यानंतर कृत्रिमपणे मशीनच्या साह्याने रक्तातील अशुद्ध पाणी काढून टाकण्यात येते.

भारतात त्यावर उपचार घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. पण तो करणे शक्य होत नसल्याने दगावणार्यां ची संख्या अधिक असल्याचे दिल्लीतील आयआयएमने केलेल्या एका पाहणीत दिसून आले.

हा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील आयआयटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञांनी एक पोकळ फायबर पडदा तयार करून त्याची प्रयोगशाळेत चाचणी घेतली असता कमी वेळात व कमी खर्चात डायलेसिस करणे शक्य होत असल्याचे त्यांना आढळले. आता या पडद्याच्या पूर्व वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत असून आगामी तीन वर्षात तो किडनीग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गत दोन वर्षांपासून हा विशिष्ट फायबर पदडा बनवण्याचे काम सुरू होते व आता त्याचे पेटण्टसुद्धा मिळवले असल्याचे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment