बणेरघट्टा अभयारण्य
भारतातील पहिले फुलपाखरू उद्यान म्हणून प्रसिद्ध असलेले बणेरघट्टा अभयारण्य कर्नाटक राज्यात आहे. येथे फुलपाखरांच्या २० हून अधिक जाती दिसतात. १९७४ पासून प्रसिद्ध असलेल्या या जंगलाला २००२ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला असून येथे म्युझियम व प्राणीसंग्रहालय एकाच नावाखाली पाहायला मिळते. या नॅशनल बायोलॉजिकल पार्कमध्ये सफारी घेण्याची सुविधा आहे.
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १०
जंगलाचे रहिवासी आहेत वाघ, बिबटे, सिह, अस्वले, हत्ती आणि अनेक अन्य प्राणी. ९० च्या दशकात या जंगलात एका १५ वर्षांच्या वाघाने पाच वर्षांची मुलगी ठार केली होती तेव्हापासून हे जंगल असुरक्षित म्हणून बदनाम झाले होते. मात्र आता याला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे आणि सफारी असल्यामुळे प्राणीप्रेमींसाठी ते सुरक्षितही बनले आहे. एलिफंट कॉरिडॉरचा हे अभयारण्य एक भाग आहे.
येथे प्राण्यांना संरक्षण असल्याने भारतातील संपन्न प्राणीजगताचा अनुभव येथे घेता येतो. जंगलात राहण्यासाठी कर्नाटक टूरिझमची रिसॉर्ट आहेत. जवळचे शहर आहे बंगलोर. अवघ्या १३ मैलावर असलेल्या बंगलोर येथून येथे येणे सोपे जाते. मंगळवारी अभयारण्य बंद असते व इतर दिवशी त्याची वेळ आहे सकाळी नऊ ते पाच. या जंगलाला भेट देण्यासाठी सप्टेंबर ते जानेवारी हा चांगला काळ आहे.