जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम

uddhav
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोकणातील जैतापूर अणुउर्जाप्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून जैतापूरवासियांच्या पाठिशी शिवसेना असल्याचा पुनरूच्चार केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोकणवासियांनी शिवसेनेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन दिवस कोकण दौ-यावर आहेत. सकाळी दहा वाजता गणपतीपुळे येथील ‘श्रीं’चे दर्शन घेऊन त्यांच्या दौऱयाचा प्रारंभ झाला. कोकणचा दौरा हा माझा राजकीय दौरा नसून, कोकण हे माझे घर असल्याची भावना ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. आज दिवसभर ते रत्नागिरी जिल्हयाचा दौरा करणार असून, उद्या सिंधुदूर्ग जिल्हय़ाच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात उद्धव ठाकरे कोकणातील आंबा बागायतदार, मच्छिमार, चिरेखाण व्यावसायिक आणि कोकणी जनेतच्या समस्या जाणून घेणार असून, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

Leave a Comment