बीसीसीआयची सूत्रे हाती पुन्हा घेऊ द्या- श्रीनिवासन

srinivasan
नवी दिल्ली – एन.श्रीनिवासन यांना आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी न्यायमूर्ती मुदगल समितीने क्लिन चीट दिल्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

श्रीनिवासन आणि बीसीसीआयच्या अन्य चार अधिका-यांनी स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या तीन क्रिकेटपटूंवर मुदगल समितीने कारवाई केली नसल्याचे म्हटले होते. मात्र श्रीनिवासन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी हे प्रकरण झाले तेव्हा शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष होते. तर सचिव म्हणून मी भारतीय संघाचे व्यवस्थापकाकडून आलेला अहवाल अध्यक्षांकडे पाठवल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने २८ मार्च रोजी श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. आता चौकशी पूर्ण झाली असून त्यात श्रीनिवासन यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा बीसीसीआयच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे.