निफ्टीचा नवा उच्चांक

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने परकीय गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्यामुळे पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८७ अंकांच्या वाढीसह २८,२५४ अंकांवर पोहोचला.

राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीवरही याचा सकारात्मक परिणाम झाला असून, निफ्टीने ६० अंकांच्या वाढीसह ८,४६१.६५ चा नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टीने याआधीचा १९ नोव्हेंबरचा ८,४५५.६५ या उच्चांकी स्तराचा विक्रम मोडला.

बॅकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य सुविधा, धातू, वाहन आणि तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. केंद्र सरकाच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमात अधिक प्रगती होईल या अपेक्षेने शेअर बाजारात तेजी आहे.

आयएनजी वैश्य बँकेचे कोटक महिंद्रा बँकेमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या वृत्तामुळे दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आहे. कोटक महिंद्र बँकेने आयएनजी वैश्य बँकेच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. ही विलीनीकरणाची प्रक्रिया शेअर्स स्वॅपिंगच्या माध्यमातून होणार आहे.

Leave a Comment