नरेंद्र मोदी टाईमचे पर्सन ऑफ द इअर ?

times-modi
अमेरिकेतील प्रतिष्ठीत टाईम मासिकातर्फे जाहीर केल्या जात असलेल्या पर्सन ऑफ द इयर साठी यंदा मोदींची निवड होऊ शकते असे संकेत मिळू लागले आहेत. आजवर या मासिकाने मोदींचा उल्लेख विवादास्पद नेते असाच केला होता. मात्र मोदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी उचललेली पावले आणि त्यांनी लोकसभेत मिळविलेला ऐतिहासिक विजय यामुळे मोदींविषयी या मासिकाला आपले मत बदलावे लागले आहे.

दरवर्षी या किताबासाठी मासिकाच्या वाचकांकडून मते मागविली जातात आणि त्या मतांच्या आकडेवारीनुसार हा किताब जाहीर केला जातो. सध्या मते मागविण्याचे काम सुरू असून त्याचा निकाल पुढील महिन्यात जाहीर केला जाणार आहे. सध्या पर्सन ऑफ द इयरच्या यादीत मोदी चार नंबरवर आहेत. त्यांच्यापुढे रशियाचे अध्यक्ष पुतीन, पाकिस्तानची मलाला युसुफझाई, इबोला आजारावर आपले प्राण पणास लावून काम करत असलेले डॉक्टर्स व नर्सेस यांचा समावेश आहे. इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती जोको विडोडोही या स्पर्धेत आहेत.

या यादीसाठी स्पर्धेत असलेल्या अन्य नेत्यांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, ईराणचे नेते अयातुल्ला खोमेनी, इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू,, इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बगदादी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिग, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी, माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचा समावेश आहे. उद्योग क्षेत्रातील यादीत अमेझॉनचे सीइ्र्रओ जेफ बेजोस, चीनी ई कॉमर्स कंपनी अलीबाबाचा संस्थापक जंक मा, जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीईओ मेरी बारा, अॅपलचा र्टाम कुक यांचा समावेश आहे.

Leave a Comment