कॉन्टिनेन्टलने केली नवीन प्रिमियम कार टायरची घोषणा

continental
हनोवर, जर्मनी – आघाडीची आंतरराष्ट्रीय टायर उत्पादक आणि ऑटोमोटीव्ह वितरण कंपनी कॉन्टिनेन्टल एजीने नव्याने विकसीत करण्यात आलेली ‘कॉन्टी मॅक्स कॉन्टॅक्ट एमसी५’ आणि ‘कॉन्टी कन्फर्ट कॉन्टॅक्ट सीसी५’ ही प्रिमियक प्रवासी वाहतूक गाड्यांसाठी वापरल्या जाणार्या टायरची उत्पादने भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल केली आहेत. टायरचे हे प्रकार भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा पध्दतीने जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आले आहेत.

त्याचवेळी सर्वोत्तम भर हा सुरक्षितता आणि आराम या गोष्टींवर देण्यात आला आहे. कॉन्टिनेन्टल ने पीएलटी टायर्ससाठी अत्याधुनिक अशी उत्पादन सुविधा मोदीपुरम या आपल्या सध्याच्या टायर कारखान्यामध्येच सुरु केली आहे. या सुविधेमध्ये सुरुवातीची क्षमता 800,000 टायर प्रतिवर्ष असून पुढे गरजेप्रमाणे क्षमतावृध्दी सोय त्यात आहे.

निर्मिती क्षमतांमध्ये गुंतवणूक करणे हा आमच्या ‘व्हिजन 2025’ या जागतिक धोरणाचा भाग असून त्यातून आम्हाला आमच्या जागतिक निर्मितीक्षेत्रातील आपले स्थान अधिक बळकट करावयाचे आहे आणि भारतासारख्या वाढत्या बाजारपेठेमध्ये व्यवसायवृध्दी साधायची आहे. सर्व गुंतवणूकीचा विचार करता कॉन्टिनेन्टल ने अनेक देशांमधील नवीन उत्पादन कारखान्यांच्या उभारणीमध्ये दोन अब्ज युरोंची गुंतवणूक केली आहे. हे कारखाने रशिया, चीन आणि अमेरीका यांसारख्या देशांमध्ये आहेत. त्याशिवाय २०११ पासून कंपनी सद्यस्थितीतील कारखान्यांचा विस्तार साधते आहे. आता आम्ही रॅडिकल कार टायरसाठी भारतात निर्मिती सुविधा दाखल करत असल्याचा आम्हाला अधिक आनंद आहे, असे उद्गार टायर विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी मंडळ सदस्य निकोलाई सेटझर यांनी काढले.

Leave a Comment