इतर बँकांना रिझर्व्ह बँकेने लावला चाप

rbi
मुंबई : तुमच्या बँक खात्यात जर कमीतकमी बॅलन्स नसेल तर तुमच्याकडून दंड वसूल केला जातो, पण आता काळजी नको. आता हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. खात्यात किमान रक्कम नसल्याबद्दल सरार्स दंड आकारणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला. आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आता दंड आकारण्यापूर्वी ग्राहकाला किमान १ महिन्याची नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ईमेल, पत्र, एसएमएस असे पर्याय बँकांना वापरता येतील.

या एका महिन्यात ग्राहकाने मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही, तर त्याला कल्पना देऊन दंड आकारता येईल. मात्र हा दंड सरसकट आकारण्यासही रिझर्व्ह बँकेने मज्जाव केला आहे.

किमान रक्कम आणि खात्यात असलेल्या रक्कमेवरील तफावत यावर आधारित हा दंड असावा, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयची ही नवी नियमावली एक एप्रिल २०१५पासून लागू होईल.

Leave a Comment