कोलंबो – श्रीलंकेत अध्यक्षपदाचा कालावधी सहा वर्षाचा असतो. तर संविधानानुसार मुदतपूर्व निवडणुका घ्यायचा असतील तर किमान चार वर्षाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असते आणि राजपक्षे यांचा हा कालावधी बुधवारी पूर्ण झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली.
श्रीलंकेचे अध्यक्षांनी केली मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा
सलग तिस-यांदा अध्यक्ष होण्याची राजपक्षे यांना इच्छा आहे. याआधी २००५ आणि २०१०मध्ये अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. २०१०मध्येही त्यांनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या. आताही त्यांचा सहा वर्षाचा कालावधी २०१६मध्ये पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी निवडणुकीची घोषणा केली आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रानुसार श्रीलंकेत जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष चारवर्षानंतर मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतात. यासंदर्भातील घटनादुरुस्तीला याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले होते.