मुंबई – वादग्रस्त वत्तव्य करून शिवसेनेला अडचणी आणण्याचा प्रयत्न करणाऱया खासदार संजय राऊत यांची प्रवत्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून शिवसेनेने आपले नव्या सहा प्रवक्त्यांची निवड केली आहे. एक प्रकारे राऊत यांना धक्का मानण्यात येत आहे.
प्रवत्तेपदावरून संजय राऊत यांची उचलबांगडी
सहा प्रवक्त्यांची नावे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चक्क संजय राऊत यांचे नाव प्रवक्तेयादीतून वगळण्यात आलेय. अरविंद सावंत, निल्हम गोऱ्हे, डॉ. मनिषा कायंदे, विजय शिवतारे, अरविंद भोसले, अमोल कोल्हे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.