नवी दिल्ली: टाईम मॅगझीनच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट २५ महत्वाच्या संशोधनांमध्ये भारताची अंतराळ संस्था इस्त्रोच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या मंगळयान मोहिमेला स्थान देण्यात आल आहे.
टाइमने घेतली ‘मंगळयान मोहिमे’ची दखल
मंगळयान ही मोहीम भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेमध्ये यान प्रस्थापित करण्यात यश आले होते. याआधी कोणत्याही आशियाई देशाला पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठ यश लाभले नसल्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरीचा गौरव टाईम मॅगझीनेही केला आहे. भारत वगळता रशिया, युरोप यांच्यापैकी कोणीही पहिल्या प्रयत्नात मंगऴावर पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्याचा पराक्रम केलेला नाही. याची दखल घेत टाइम मॅगझिनने भारतीय मंगळ मोहिमेचा गौरव केला आहे.