बेंगळूर : भारताचा अव्वल स्नुकरपटू पंकज अडवाणीने पुरूष विभागात तर महिला विभागात भारताच्या राष्ट्रीय विजेत्या विद्या पिल्लेने येथे सुरू असलेल्या आयबीएफ विश्व स्नुकर स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आयबीएफ विश्व स्नुकर स्पर्धेत पंकज अडवाणीची विजयी सलामी
अग्रमानांकित अडवाणीने पुरूष विभागातील झालेल्या पहिल्या सामन्यात मलेशियाच्या मोहचा ४-२ अशा फेम्समध्ये पराभव केला. अडवाणीने पहिल्या दोन फेम्समध्ये अनुक्रमे ६५ आणि ८५ गुणांचे ब्रेक्स नोंदविले. महिलांच्या विभागात रशियाच्या एस. ऍनास्टेसियाचा भारताच्या विद्या पिल्लेने ३-० असा पराभव करून विजयी सलामी दिली. महिला विभागात भारताच्या निना प्रवीण, ए. कामिनी, मिनल ठाकुर, नीता संघवी, एम. चित्रा यांनी आपले सामने जिंकले.