शांतता आणि विकास कार्यासाठी इस्रोला इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर

isro
नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संस्था इस्रोला सन २०१४ चा इंदिरा गांधी शांतता विकास आणि निरस्त्रीकरण पुरस्कार देण्यात करण्यात आला आहे. जागतिक सहयोगातून अंतराळ संशोधनाचा उपयोग शांततेच्या कार्यासाठी करून घेण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली. मंगळयान मोहीम, अंतराळ संशोधन आदी क्षेत्रातून इस्त्रोने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे.

तसेच देशातील ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यात इस्त्रोने मोठी भूमिका बजावली आहे.

भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचे इस्त्रोने दाखवून दिले आहे. तांत्रिक आणि अत्याधुनिकतेत भारताने अव्वल देशांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.

Leave a Comment