रशियाच्या रहस्यमय उपग्रहामुळे चिंता

russia
मास्को – रशियाने अंतराळात सॅटेलाईट किलर उपग्रह गुप्तपणे लाँच केला असावा या शंकेने विविध देशांच्या अंतराळ संस्थांचे अधिकारी चिंतेत पडले आहेत. स्पेस एजन्सीजनी रहस्यमय रशियन आब्जेक्ट ट्रॅक केले आहे आणि हा उपग्रह नष्ट करू शकणारा अथवा अंतराळातून हल्ला चढविणारा उपग्रह असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार आक्टोबर २०१४ मध्ये ही रहस्यमय वस्तू प्रथम ट्रॅक केली गेली तिचे नामकरण २८ ई असे केले गेले आहे. रशियाने हा कथित उपग्रह मे मध्येच लाँच केला होता तेव्हाही त्यामागचे कारण स्पष्ट केले गेले नव्हते.

रशियाने हा उपग्रह कोणत्या कारणासाठी प्रक्षेपित केला याचा उल्लेख केलेला नाही. स्पेस एजन्सीमधील अधिकारी तसेच हौशी खगोलनिरीक्षकही सातत्याने या वस्तूवर लक्ष ठेवून आहेत कारण तो चुकीच्या दिशेने प्रवास करत आहे. बुधवारी सकाळी तो दक्षिण पॅसिफिक महासागरात दिसला असून त्याचा मागोवा ऑनलाईन पद्धतीनेच घेतला जात आहे.

थिक टँक चेथम हाऊसच्या संशोधक संचालक पॅट्राशिया लुईस यांच्या मते हा उपग्रह प्रयोगशील असावा मात्र नागरी आणि लष्करी विभागातील अनेक तर्हेईची कामे करण्याची जबाबदारी त्याच्यावर असावी. कदाचित त्याचे काम दुसरे उपग्रह नष्ट करणे आणि सॅटेलाईट ते सॅटेलाईट सायबर अॅटॅक करणे असेही असू शकते. उपग्रह दळणवळण जॅम करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

Leave a Comment