बीएमडब्ल्यूची पाच दरवाजे असलेली मिनी कार लाँच

mini
भारतात मिनी कार ब्राँडला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन जर्मन कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने छोटी पाच दरवाजे असलेली मिनी कूपर कार लाँच केली आहे. पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारात ही कार उपलब्ध करून दिली गेली आहे. तीन दरवाजे असलेली मिनीकूपर डी ही कार २०१२ पासूनच भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष फिलिप वोन्सार या संदर्भात बोलताना म्हणाले की भारतात पाच दरवाजे असलेली मिनी कूपर प्रथमच लाँच केली जात आहे. यापूर्वी तीन दरवाजे असलेल्या मिनी कूपर डी मॉडेलच्या १ हजार गाड्या विकल्या गेल्या आहेत. नवीन पाच दरवाजे असलेली मिनीकूपर तासाला २३३ किमी च्या वेगाने धावू शकते. तिची किंमत आहे ३५ लाख २० हजार रूपये.

Leave a Comment