सेल्फीची प्रिंट काढून देणार मोबाईल कव्हर

selfi
फ्रान्सच्या प्रिंट या कंपनीने स्मार्टफोनसाठी एक अनोखे कव्हर तयार केले आहे. यामुळे रस्त्यात अथवा कुठेही आपण आपल्या स्मार्टफोनवरून सेल्फी काढली असेल तर त्या फोटोचे प्रिंट तुम्हाला हे कव्हर १ मिनिटाच्या आंत प्रिंट करून देणार आहे. यासाठीचा प्रिंटर ब्ल्यू टूथच्या सहाय्याने स्मार्टफोनशी कनेक्ट केला जातो आणि प्रिंट अशी कमांड दिली की ५० सेकंदात आपण काढलेल्या सेल्फीची प्रिंट आपल्या हातात येते.

सध्या ही प्रिंट कव्हर सुविधा फक्त चार इंची स्क्रीनच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध असली तरी लवकरच ही सर्व साईजच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध केली जाईल असे कंपनीने जाहीर केले आहे. त्याचबरोबर कंपनी ५० सेकंदाऐवजी ३० सेकंदातच प्रिंट मिळू शकेल अशा डिव्हाईसवर काम करत असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या फोटो प्रिंट करताना युजर १ कागद लावू शकतो त्याऐवजी एकाचवेळी ३० एकाच वेळी प्रिंट होऊ शकतील अशी सुविधा देण्याचाही कंपनीचा प्रयत्न आहे.

या अद्भूत कव्हर प्रिंटरची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत आहे ९९ डॉलर्स म्हणजे सुमारे ६ हजार रूपये.

Leave a Comment