राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर

drought
मुंबई – राज्यातील ३९ हजार १३४ गावांपैकी जवळपास १९ हजार ६९ हजार गावांना सरकारने दुष्काळग्रस्त घोषित केले असून त्यांना किती आणि कधी मदत करायची याबाबत निर्णय घेतलेला नाही. या मदतीसाठी राज्य सरकार पूर्णपणे केंद्र सरकारवर अवलंबून आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठवडय़ात याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर करून मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या दुष्काळामुळे जवळपास ५० हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

दुष्काळाची स्थिती मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आहे. मात्र राज्य सरकारने त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर न करता टंचाईग्रस्त गावे म्हणून त्यांना जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. सर्वात जास्त दुष्काळाची झळ ही मराठवाडय़ाला बसली आहे. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला असून त्याला मदतीची गरज आहे.

Leave a Comment