मध्यावधी निवडणुकाची शक्यता कमीच -मुख्यमंत्री

devendra-fadnvis
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच राजकीय पक्षांना पुन्हा निवडणुका नको असल्यामुळे आपले सरकार स्थिर राहणार असून राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलिबागमध्ये झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसल्याने राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली.

राज्यातील जनतेने आम्हाला मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. सरकारने पाच वर्ष काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. याशिवाय राजकीय पक्षांना किंवा आमदारांना मुदतीपूर्वीच निवडणुका व्हाव्यात असे वाटत नाही. आपले सरकार स्थिर आहे. त्यामुळे आम्हाला कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Comment