भारताच्या महिला संघाचा आफ्रिकेवर डावाने विजय

harman-preet
म्हैसूर – भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी चौथ्या आणि अंतिम दिवशी बुधवारी एक डाव आणि ३४ धावांनी विजय मिळविला आहे.

फॉलोऑननंतर दुस-या डावात ६ बाद ८३ धावा अशी अवस्था झालेल्या पाहुण्यांचा दुसरा डाव ३७.२ षटकांत १३२ धावांत संपला. त्रिशा चेटी (३५) आणि क्लोइ ट्रीयॉनच्या सातव्या विकेटसाठीच्या ६७ धावांच्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला पराभव थोडा लांबवता आला. मात्र चेटीच्या विकेटनंतर पुढील तीन विकेट १२ धावांत पडल्या.

भारतातर्फे मध्यमगती हरमनप्रीत कौरने चार विकेट घेत सामन्यातील विकेटची संख्या नऊवर नेली. हरमनप्रीतप्रमाणेच झुलन गोस्वामी आणि पूनम यादवने (प्रत्येकी २ विकेट) दुस-या डावात प्रभावी मारा केला. हरमनप्रीतसह सलामीवीर थिरुश कामिनी (१९२) आणि पूनम राउतची (१३०) दमदार फलंदाजी भारताच्या मोठय़ा विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.

Leave a Comment