बनावट ट्विटर अकौंटने राज ठाकरे हैराण

raj
मुंबई – महाराष्ट्र* नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुलगा अमित व मुलगी उर्वशी यांच्या नावाने बनविल्या लेल्या ट्विटर अकौंटमुळे हैराण झाले असून त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की माझ्या कुटुंबात कुणाचेच ट्विटर अकौंट नाही. मुलगी उर्वशी हिच्या नावाने बनावट अकौंट कुणीतरी उघडले आहे आणि त्यावरून सातत्याने अन्य पक्षातील नेते यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मुलगा अमित आणि उर्वशी यांच्या या बनावट अकौंटवरून बाळासाहेबांचे स्मारक करण्याची मागणीही केली गेली आहे. २०१२ सालापासून हा प्रकार सुरू आहे मात्र ही अकौंट आजही बंद झालेली नाहीत. आता तर राज यांच्या नावाचेही बनावट ट्विटर अकौंट खोडसाळपणाने उघडले गेले आहे. या विरोधात पोलिस तक्रार करण्यात आली असून ही अकौंट त्वरीत बंद करावीत आणि हा उद्योग करणार्‍यांना पकडले जावे अशी मागणी मनसेतर्फे केली गेली आहे.

Leave a Comment