गुजरातवर मात करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’

devendra-fadnvis1
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ हे मिशन हाती घेतलेअसून महाराष्ट्रातील उद्योगपतींना गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आवतण दिलेले असताना, त्यांच्या ‘व्हायब्रंट गुजरात’वर कुरघोडी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे देवेंद्र यांनी दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकासासह सर्व प्रांतात अव्वल क्रमांकावर आहे आणि राहील, असा निर्धार राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजप सरकारने व्यक्त केला आहे. परंतु, हे आव्हान पेलणे सोपे नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमके ठाऊक आहे. वेगवेगळ्या राज्यांनी, प्रामुख्याने गुजरातने बड्या उद्योगांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. त्यांना हव्या त्या सोयी-सुविधा पुरवायला ते तयार आहेत. याउलट, लोडशेडिंग, लाल फितीच्या कारभारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा उद्योगजगतात काहीशी मलिन झाली आहे. अशावेळी, राज्यात उद्योगांना पोषक वातावरण कसे निर्माण करता येईल, यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Comment