उच्च न्यायालयाने वारकऱ्यांवर ओढले ताशेरे

mumbai-high-court
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने यात्रेच्या दरम्यान वारक-यांकडून स्वच्छतागृहांची व्यवस्था असतानाही त्याचा वापर केला जात नसल्यामुळे नदीकाठ आणि शहरात घाणीचे साम्राज्य पसरत असून पंढरपुरातल्या अस्वच्छतेला वारकरीच जबाबदार असल्याचा म्हणत वारकऱ्यांवर ताशेरे ओढले असून त्याबरोबरच विठ्ठल रूख्मिणी मंदिर समिती यासंदर्भात कोणतीच पावले उचलत नसल्याचा ठपकाही ठेवला आहे.

पंढरपुरातील स्वच्छतेबाबत दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सारीनाथ सारीपुत्र आणि स्वराज जाधव यांनी सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाने अस्वच्छतेसाठी वारक-यांना जबाबदार धरले आहे. पुढच्या सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात येणार आहेत. या सुनावणीसाठी विठ्ठल रूख्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment