स्मार्टफोनच्या दुनियेत आता ‘टी-सीरीज’देखील

t-series
मुंबई – संगीत क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या टी-सीरीज कंपनीने नुकताच एक स्मार्टफोन लाँच केला आहे. टी-सीरीज फेदर एसएस९०९ या नावाने हा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला आहे. सध्या या स्मार्टफोनची विक्री स्नॅपडील या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर सुरु असून ५७९९ रु. किंमतीला हा फोन उपलब्ध आहे.

टी-सीरीज फेदर SS९०९ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये: ९६०x५४० पिक्सल रेझ्युलेशन ४.५ इंच डिस्प्ले, १.३ गीगाहर्त्झ क्वॉड-कोअर, मीडियाटेक MT६५८२ प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम, ८ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश कॅमेरा, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ३२ जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड क्षमता, १६००mAh बॅटरी क्षमता, ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस

Leave a Comment