शरीर संबंधापेक्षा चुंबन घातक

KISS
स्त्री-पुरुष शरीर संबंधामुळे काही रोगांचा फैलाव होतो. विशेषत: ज्यांना गुप्तरोग म्हटले जाते असे काही रोग लैंगिक संबंधातून पसरत असतात. त्यात गर्मी, परमा आदि रोगांचा समावेश असतो. विशेषत: एडस् हा लैंगिक संबंधातूनच पसरतो. असे रोगांच्या प्रसाराबाबत लैंगिक संबंधाची बदनामी केली जात असली तरी काही तज्ज्ञांच्या मते प्रत्यक्ष शरीर संबंधापेक्षा केवळ चुंबन घेण्याने अधिक रोगजंतूंचा फैलाव होतो. म्हणजे चुंबनाने प्रेम पसरत नसून रोगकारक विषाणू पसरतात.

सध्या भारतामध्ये काही ठिकाणी काही सुधारलेल्या आधुनिक विचाराच्या तरुणांनी जाहीररित्या परस्परांची चुंबने घेण्याची मोहीम सुरू केली आहे. तिला अनेकांचा विरोध आहे आणि त्यामुळे देशभरात वाद निर्माण झालेले आहेत. परंतु ही आधुनिक पुरोगामी मंडळी या जाहीर चुंबनांचे समर्थन करत आहेत. त्यांच्या मते या चुंबनातून प्रेम पसरते, पण डॉक्टर म्हणतात, दहा सेकंदाच्या चुंबनातून आठ कोटी विषाणूंची देवाणघेवाण होऊ शकते.

चुंबनाच्या क्रियेमध्ये जीभ, ओठ, लाळ आणि दात यांचा परस्परांंशी संपर्क येतोच. लाळेमधून अनेक प्रकारचे रोगजंतू पसरत असतात. त्यामुळे चुंबनाबाबत सावध रहा, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चुंबनाच्या क्रियेमध्ये शरीराचे इतर अवयवसुद्धा आलिंगनामुळे जवळ आलेले असतात आणि त्यांना आलेल्या घामातून सुद्धा रोगजंतूंचा प्रसार होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये अब्जावधी सूक्ष्म रोगजंतू असतात. त्यांचा प्रसार अशा कृत्यातून होत असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही