नवी दिल्ली – ऑनलाइन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर मोटोरोलाने अँड्रॉइड ५.० लॉलिपॉपवरील ‘नेक्सस ६’ हा नवाकोरा स्मार्टफोन उपलब्ध केला असून या फोनसाठी ४३,९९९ रुपयांत प्री-बुकिंग सुरू केल्याचे मोटोरोलाने म्हटले आहे.
फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला ‘नेक्सस ६’
गुगलने जागतिक स्तरावर गेल्याच महिन्यामध्ये मोटोरोलाने तयार केलेला हा फोन लाँच केला होता. हा फोन ग्राहकांच्या हाती साधारणत: डिसेंबरच्या दुस-या आठवडयात देण्यात येणार आहे. ३२ जीबी प्रकारातील या फोनची किंमत ४३,९९९ रुपये आणि ६४ जीबीच्या फोनची किंमत ४८,९९९ रुपये आहे.
या फोनवर तीन ऑफर देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांसाठी फ्लिपकार्ट फर्स्टचे मोफत सदस्यत्व, एक्स्चेंज ऑफरमध्ये १०,००० रुपयांची सवलत, १५०० रुपयांची कॅशबॅक आणि २१०० रुपये किमतीची पूर्वनिवड केलेली मोफत ई-बुक्स यांचा समावेश आहे.