मुंबई – बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बाजारांनी उच्चांकी स्तराला गवसणी घातली.
पुन्हा एकदा उच्चांकी स्तराला गवसणी
बुधवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १३०.७२ अंकाची वाढ होत त्याने २८ हजार २९४.०१ या नव्या उच्चांकी स्तरावर पोहचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २९.७५ अंकांची वाढ होत त्याने आठ हजार ४५४ हा ऐतिहासिक स्तर गाठला.
यापूर्वी मंगळवारीही सत्राची सुरुवात तेजीत झाली होती आणि सेन्सेक्सने २८ हजार २६०.६६ तर निफ्टीने आठ हजार ४४७.४० या स्तराला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर दिवसभरात शेअरबाजारात नफावसुली झाल्याने दोन्ही निर्देशांकाची शिखरावरून घसरण झाली.