मोदी जगात सर्वोत्कृष्ट डिसिजन मेकर

modi-shah
वॉशिग्टन – अमेरिकेतील फॉरिन पॉलिसी या प्रतिष्ठित मासिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वोत्कृष्ट डिसिजन मेकर म्हणून निवड केली असून १०० ग्लोबल थिंकर्सची यादी त्यांनी जाहीर केली आहे. या यादीत मोदींच्या पाठोपाठ जर्मनीच्या चॅन्सलर अॅजेला मर्कल यांचा समावेश आहे तर तिसर्‍या स्थानावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निवडले गेले आहे.

या मासिकाने मोदींची सर्वोत्कृष्ट डिसिजन मेकर म्हणून निवड करताना मोदींचे वर्णन करिश्मा असलेला आणि बिझिनेस फ्रेंडली नेता असे केले आहे. मोदींच्या निर्णयांमुळे भारताच्या विकासाला चालना मिळाल्याचेही यात नमूद केले गेले आहे. मोदींच्या भाषणाला हजारोंच्या संख्येने जमत असलेली गर्दी, थ्रीडी होलीग्राफिक प्रोजेक्शनमधून लक्षावधी लोकांशी साधलेला संवाद आणि अमेरिकेने मोदींवर गुजराथ मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलींमुळे घातलेली व्हीसा बंदी यांचाही उल्लेख या मासिकाने केला आहे.

पन्नास वर्षीय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे वर्णन मासिकाने उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीतील अतिशय यशस्वी प्रचारयंत्रणा मशीन असे केले आहे. या यादीत स्टेट बँकेच्या प्रमुख अरूंधती रॉय, सी द नेट स्वराचे संस्थापक शुब्रांशू चौधरी, न्यूज अँकर पद्मिनी प्रकाश यांचाही समावेश केला गेला आहे.

Leave a Comment