भारताला युरेनियम देणार ऑस्ट्रेलिया – टोनी अॅबोट

tony
शांतीपूर्ण कामासाठी भारताला ऑस्ट्रेलिया युरेनियमचा पुरवठा करणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी पत्रकरार परिषदेत केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी यांनी द्विपक्षीय वार्तालापात पाच करारांवर स्वाक्षर्‍या केल्या त्यानंतर पत्रकारांशी अॅबोट बोलत होते.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने सामाजिक सुरक्षा, कैदी हस्तांतरण, मादक पदार्थ तस्करी विरोधी मोहिम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रातील करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी मोदी यांनी दोन्ही देशांत असैन्य परमाणु करार लवकरात लवकर केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे ऑस्ट्रेलिया या क्षेत्रात भारताचा भागीदार बनू शकेल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कृषी, उर्जा, अर्थ, शिक्षण, विज्ञान, उद्योग क्षेत्रातही परस्पर सहयोगाच्या अनेक संधी असल्याचे सांगितले.

यावेळी अॅबोट यांनी उर्जा आणि सुरक्षेशिवाय इंटेलिजन्स, सैन्य सहयोग, दहशत विरोधी सहकार्य. द्विपक्षीय त्रिपक्षीय सैन्य सराव सहायोगासही ऑस्ट्रेलिया भारताबरोबर करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. मोदींनी कॅनबेरा येथे वॉर मेमोरियलला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि टोनी यांना चांदीची मानसिह ट्राफी आणि झाशीच्या राणीचे पत्र या वस्तू भेट दिल्या.

Leave a Comment