एज्युरिका टेक्नॉलॉजीच्या महसूलात २७६८ टक्के वाढ

edurika
बंगलोर – जागतिक सल्लागार फर्म डिलॉईट ने भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या कंपन्यांत बंगलोरच्या एज्युरिका कंपनीला प्रथम स्थान दिले असून ब्रेनफोर्स एज्युकेश सोल्युशन्स प्रा. लिमिटेड म्हणजेच एज्युरिकाचा महसूल गेल्या तीन वर्षात २७६८ टक्क्यांनी वाढला असल्याचे नमूद केले आहे. डिलॉईटने २०१४ सालात अतिवेगाने विकसित झालेल्या ५० कंपन्यांची यादी सादर केली आहे. हा विकासदर कंपनीच्या महसूलावर आधारित आहे.

या यादीनुसार बंगलोर हेच आजही टेक्नॉलॉजी कंपन्यांचे हब असल्याचे नमूद केले गेले आहे. कारण ५० कंपन्यांच्या या यादीत १७ कंपन्या बंगलोर येथीलच आहेत. त्यात पहिल्या दहा कंपन्यांत पाच कंपन्या बंगलोर येथील आहेत. प्रथम स्थानावर असलेल्या एज्युरिकातर्फे ऑनलाईन पद्धतीने वैयक्तीक तसेच ऑरगनायझेशन्ससाठी एज्युकेशन प्लॅटफॉर्म, बिझिनेस संबंधी टेक्नॉर्लॉजी चे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे याचा लाभ भारताबरोबरच जगभरातले इच्छुक विद्यार्थी घेत आहेत.

या यादीत दोन नंबरवर बंगलोरचीच हॅपीएस्ट माईंड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून तिचा महसूल गेल्या तीन वर्षात २३७७ टक्कयांनी वाढला आहे. तीन नंबरवर दिल्लीची ऑनलाईन रेस्टॉरंट डिस्कव्हरी गाईड झोमॅटो ही कंपनी आहे. या कंपनीच्या महसूलात १३९९ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

Leave a Comment