बहुतेक कार्यालयातून फेसबुक साईटवर बंदी घातली गेली असतानाच फेसबुकने फेसबुक अॅट वर्क अशी प्रोफेशनल साईट तयार केली असून ती लवकरच लाँच केली जाणार आहे. या साईटच्या सध्या चाचण्या घेतल्या जात आहेत. यामुळे फेसबुक गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि लिंकडेनशी स्पर्धा करू शकणार आहे. या साईट सध्या सर्वाधिक लोकप्रिय प्रोफेशनल साईट आहेत.
फेसबुक अॅट वर्क साईट लवकर
फेसबुकच्या नव्या प्रोफेशनल साईटमध्ये युजरला न्यूज न्यूज फीड प्रोफाईल व्हिजिट करण्याची सुविधा दिली जाणार नाही. त्याऐजवी युजरला त्याच्या कामाशी संबंधित नेटवर्कला जोडले जाईल तसेच कार्यालयीन सहकार्यांशी चॅट करण्याची सुविधा दिली जाईल. या साईटचे रूपडे जुन्या साईटप्रमाणेच असेल मात्र युजरची प्रोफेशनल ओळख सोशल नेटवर्क पासून वेगळी ठेवली जाईल. या संबंधीचा रिपोर्ट फर्स्ट पोस्टने दिला असून हा प्रोजेक्ट गतवर्षीच हाती घेण्यात आला होता व आता त्याच्या चाचण्या सुरू असल्याचे नमूद केले गेले आहे. या साईटसाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे.