उंदीर मारा- मोबाईल मिळवा

mouse
खरेदी हा कोणत्याही वर्गातील नागरिकांचा आवडीचा विषय. खरेदी वाढावी यासाठी कंपन्या नित्याने नवनवीन योजना ग्राहकांसाठी आणत असतात. दक्षिण आफ्रिकेतील एका चॅरिटी संस्थेने मात्र खरेदी वाढण्यासाठी नाही पण उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी अनोखी योजना जाहीर केली आहे. ६० उंदीर मारा आणि मोबाईल मोफत घेऊन जा अशी ही योजना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथे उंदरांचा त्रास नागरिकांना असह्य होत असल्याने त्यांनी चॅरिटी संस्थेला उंदीर मारण्यासाठी कांही करा असे पत्र लिहिले. या संस्थेने शक्कल लढवून ६० उंदीर मारा आणि मोबाईल मोफत न्या ही योजना जाहीर केली. तसे एसएमएसही नागरिकांना पाठविले. या योजनेला नागरिकांकडून खूपच प्रतिसाद मिळाला असून लोक आता उंदरांच्या शोधात फिरत असल्याचे समजते. मारलेले ६० उंदीर संस्थेकडे दाखविल्यानंतरच मोबाईल दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे कांही नागरिकांनी आत्तापर्यंत दोन दोन मोबाईल मिळविलेही आहेत असे समजते.