२०१९ मध्ये संपूर्ण स्वच्छ भारत महात्मा गांधी यांना समर्पित

modi
सिडनी – मी सध्या भारतात स्वच्छतेचे महत्वपूर्ण काम हाती घेतले असून हे काम फार कठीण असले, तरी ते माझ्या हातून होणे शक्य नाही असे तरी नाही. २०१९ मध्ये मला संपूर्ण स्वच्छ भारत महात्मा गांधी यांना समर्पित करायचा असल्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथे जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांना संबोधित करताना व्यक्त केला.

भारतीयांना स्वातंत्र्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिले. आपण त्यांना स्वच्छ भारत द्यायला हवा. २०१९ पर्यंत भारताला स्वच्छ करायचाच, असा माझा ठाम निश्चमय आहे, असे जाहीर करताना, मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियात येण्यासाठी एका रात्रीचा प्रवास करावा लागतो. पण भारताच्या पंतप्रधानांना येथे येण्यासाठी २८ वर्षे लागलीत. आता मात्र ऐवढी वर्षे लागणार नाहीत. लोकशाही दोन्ही देशांचा पाया आहे. देशाच्या कल्याणासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. आजही भारतात तेच कार्यालये आणि अधिकारीही तेच आहेत. फक्त काम करण्याची पद्धत बदलली आहे. मनात इच्छा आणि जिद्द असेल, तर कुठलीही गोष्ट सहज साध्य करता येते. सर्वसामान्य नागरिकांचे बँक खाते उघडण्यासाठी आरबीआयने जिथे मल तीन वर्षे आणि अर्थमंत्रालयाने दोन वर्षे सांगितली होती, ते कार्य मी केवळ १५० दिवसांतच पूर्ण करणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअरप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचे सिडनी शहरही मोदीमय झाले होते.

Leave a Comment