
हैद्राबाद – पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या खासदार आदर्श गांव मोहिमेत सहभागी होताना राज्यसभेतील खासदार भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हात असलेले ५ हजार लोकवस्तीचे पट्टमराजू कंडरिगा हे गांव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी तो खासदार निधीतून ३ कोटी रूपये देणार असल्याचे समजते.
सचिनने घेतले पट्टमराजू कंडरिगा गांव दत्तक
गुदूर शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या या गावात सचिन शाळा, हॉस्पिटल आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. स्मार्ट गांव बनविण्याचा सचिनचा मानस आहे. गावाची लोकसंख्या ५ हजार असली तरी येथे साक्षरतेचे प्रमाण ८० टक्के आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती आणि डेअरी हेच असून हे गांव तिरूपती लोकसभा मतदारसंघात येते.
