शेअर बाजार गडगडला

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागील आठवडयात नवे उच्चांक नोंदवले, पण आज सकाळी बाजार सुरु होताच ४४ अंकांनी बाजार गडगडला.

१०६.०२ अंकांची शुक्रवारी शेवटच्या सत्रात कमाई करणा-या सेन्सेक्समध्ये ४४.५१ अंकांची घसरण झाली. २८,०४६.६६ या विक्रमी स्तरावर बंद झालेला सेन्सेक्स सोमवारी सकाळी बाजार उघडला तेव्हा २८,००२.१५ अंकांवर होता.

निर्देशांकात घट गुंतवणूकदारांनी समभागांच्या विक्रीवर भर दिल्यामुळे झाली असून मुंबई शेअर बाजारातील या घसरणीचा राष्ट्रीय शेअऱ बाजार निफ्टीवरही परिणाम झाला. निफ्टीमध्येही १८.२५ अंकांची घसरण झाली. निफ्टी ८३७१.६५ वर आहे. शुक्रवारी निफ्टी ८,३८९.९० या विक्रमी स्तरावर बंद झाला होता.

Leave a Comment