बेस्टच्या उत्पन्नावर सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने परिणाम

best
मुंबई – प्रतिकिलो साडेचार रुपये अशी सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने बेस्टला चांगलाच फटका बसला असून महिन्याला सुमारे अडीच कोटी तर वार्षिक ३० कोटी २४ लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. बेस्ट प्रशासनाने प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने डिझेलपेक्षा सीएनजीवर चालणा-या बसच्या खरेदीस प्राधान्य दिले. बेस्टच्या ताफ्यात सुमारे ४,१०० बसेस असून त्यापैकी २,९७० बस सीएनजीवर चालतात. या बसेससाठी प्रति महिना ५६ लाख एक हजार २५८ किलो इतका सीएनजी गॅस लागतो. गॅसच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर होतो. सीएनजी गॅस पुरवठादार असणार्या महानगर गॅसकडून बेस्टला प्रति किलोमागे ७० पैसे इतकी सूट देण्यात येते. या स्थितीत १ नोव्हेंबरपासून सीएनजीची किंमत प्रतिकिलो ३८ रु. ९५ पैशांवरून ४३ रुपये ७५ पैशांवर पोहोचली आहे. बेस्टला यात ७० पैशांची सूट मिळणार असून बेस्टला खरेदी किंमत ४२ रु. ७५ इतकी मोजावी लागणार आहे. या सार्यालत बेस्टच्या सीएनजी दरवाढीमुळे प्रतिकिलो ४ रुपये ५० पैशांचा भार पडणार आहे. हीच वाढ कायम राहिल्यास महिन्याकाठी २ कोटी ५२ लाख रुपये तर वार्षिक ३० कोटी २४ लाख रुपयांची जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

Leave a Comment